Vidarbh24News

Latest Online Breaking News

बिबट्याचा राष्ट्रिय महामार्गावरील इसमावर हल्ला

इसम गंभीर जखमी

हाटेला फिरायचा जाणे पडले महागात

वनमंत्र्याचे दुर्लक्ष, ठोस उपाययोजना करण्याची मागणी 

माणिकचंद मल्लाजी इटकलवार राहणार सावली हा नेहमी प्रमाणे पहाटे फिरायला गेला होता. फिरायला गेला असता चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वर राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या जवळील इन्फिनिटी पार्क समोर पहाटे पाच वाजता बिबट्याने हमला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील घटना असल्याने अपघात झाला असेल असे तर्क-  वितर्क शहरातील लोकं लावत होते परंतु सावलीतील वनविभागाच्या चमूने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आणि जखमीचे निशाण बघून वनविभागाने बिबट्याचा हमला असल्याचे निश्चित केले.
नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने हमला करुन नेणार इतक्यात एक ट्रक आल्याने बिबट पळून गेला. जखमीला गडचिरोलीला गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले तिथून गंभीरता लक्षात घेऊन नागपूरला हलविण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात अशा रोजच घटना घडत आहेत. पूर्वी जंगलात गेल्या नंतरच वन्यप्राण्यांचा हमला मनुष्यावर होत होता आता मात्र नागरिकांच्या घरात तर कधी राष्ट्रीय महामार्गावरील असे घटना घडत असल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.
वनमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे असताना या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असताना वनमंत्री मात्र बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहेत. आजपर्यंत वाघाने सावली तालुक्यात २३ लोकांचा बळी घेतला. गेल्यावर्षीच हर्षद कारमेंगे या पाच वर्षाच्या बालकाला अंगणात शौचालयासाठी बसले असता उचलून नेले. आणखी किती बळी गेल्यानंतर वनमंत्री यावर उपाययोजना करणार आहेत असा प्रश्न जनसामान्य नागरिक करीत आहेत.
एखादी घटना घडल्यास वनमंत्री वाघाला पकडण्याचे आदेश देतात व गप्प बसतात मात्र ठोस उपाययोजना आखत नाही किंवा अंमलबजावणी करीत नाहीत.
आणखी किती बळी गेल्यानंतर वनमंत्री साहेब अंमलबजवणी करणार आहेत हे वनमंत्र्यांनी सांगाणे असा सुर जनमानसातून निघत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!