*हिरापुर येथे पार पडली संविधान सन्मान सभा*
अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचा उपक्रम
अखिल भारतीय मादगी समाज संघठना शाखा सावलीच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहनभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनानुसार आज मौजा हिरापूर तालुका सावली आदिवासी समाज सभागृह येथे अखिल भारतीय मादगी समाज संघटनाच्या वतीने संविधान दिना निमित्त “संविधान सन्मान सभा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सुरवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली. देशाच्या संविधान जनजागृतीच उद्देश ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार यांनी संविधानातील मूलभूत हक्क अधिकार व मूलभूत कर्तव्य असलेले अनुच्छेद चे वाचन केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मायाताई मोहुर्ले यानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. उद्घाटक संघठनेचे प्रदेशाध्यक्ष रुपचंद लाटेलवार, दिपप्रज्वलन तालुका अध्यक्ष रमेश लाटेलवार, लक्ष्मण मोहूर्ले मेजर, प्रमुख पाहुणे सुनील नल्लूरवार, महेश देवतळे, गोपाल कलमुलवार, परशुराम बोटकावार, नानाजी कलमुलवार, बाबुराव कलमुलवार उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल बोटकावार, सूत्रसंचालन श्रुती बोटकावार तर आभार सुनिल नल्लुरवार यांनी मानले.



