व्याहाड बुज (मुराड) येथे तान्हा पोळा उत्साहात …..
सावली: व्याहाड बुज.(मुराड) येथे गेली अनेक वर्षापासूनची परंपरा सतत चालू ठेवण्यात पुराणी भजन मंडळाची महत्वाची भुमिका बजावत असते.
यावर्षी सुद्धा तान्हा पोळा उत्सव पुरानी भजन मंडळानी भजन दिंडीसह हनुमान मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने बालगोपालासह आपआपले नंदीबैल सजवून एकत्र ठिकाणी येऊन साजरा केला जातो.
या तान्हा पोळयात एक आकर्षक प्रतिमा कृती सुभाष शेरकी यांनी साजरी करतांना बेटी बचाव बेटी पढाव हा लोगों आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला.
प्रत्येक व्यक्तीने मुलीच रक्षण केला पाहिजे.मुलीला उच्च शिक्षणावर भर देऊन मुलगी ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे दर्शविले.आजच्या समाज जीवनामध्ये ही मुलगीच महत्त्वाची आहे.मुलीचे खूप रूप आहेत.ज्याप्रकारे मुलगी कन्या,पत्नी,आई,बहीण,माता असे अनेक रुप आहेत या तान्हा पोळयात हे विशेष या कृतीतून साकार झाले.
या तान्हा पोळयात प्रत्येक नंदीबैलाला नोटबुक पेन व बिस्कीट पुडा,खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच कविता बोल्लीवार,ग्रा.प.सदस्य तथा खासदार अशोकजी नेते यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम,माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार, सामाजिक नेते नामदेव भोयर,नव भारत शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष संतोष मेश्राम, सुधाकर म्याकलवार,मोहन वासेकर,प्रकाश वासेकर, राजु मेश्राम,सुभाष शेरकी,सुनिल भानोसे,मारोती शेरकी, मेश्राम सर,प्रमोद मेडपल्लीवार,सुधिर वासेकर, तसेच मोठया संख्येने उत्सावात नागरिक उपस्थितीत होते.
अशाप्रकारे तान्हा पोळा उत्सव शांततेत मोठ्या आनंदाने, व्याहाड बुज (मुराड) येथे उत्साहात साजरा करन्यात आला ……



