Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन

*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन*

सावली (रुपचंद लाटेलवार)
कौशल्य विकास समिती तर्फे “स्पर्धा परीक्षा व मुलाखतीची तयारी कशी करावी” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करण्याकरिता पंचायत समिती सावली चे गटविकास अधिकारी श्री मधुकर वासनिक सर प्रमुख वक्ते म्हणून आले होते. त्यांनी मुलांना स्पर्धा परीक्षा व मुलाखातिची तयारी कशी करावी याविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की प्रामाणिकपणे, मनलावून ,नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणार तरच आयुष्यात तुम्ही यश संपादन कराल .तसेच जीवनामध्ये आधी कोणत्या गोष्टीला सर्वात आधी महत्त्व द्यायच हे विद्यार्थांना माहिती असणे आवश्यक आहे तसेच 3H फॉर्मुला सांगत (Head,heart and hand ) यांचं व्यवस्थीत ताळमेळ असेल तरच तुमचं अभ्यास ताळमेळ बरोबर होणार.

अश्याप्रकरे त्यांनी आपल्या अनुभवातून शिकलेले विविध गोष्टी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे यांनीसुद्धा मुलांना धेय्य निश्चित करून अभ्यासाला लागा असे आवाहन केले.कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉ. कामडी प्राध्यापक वासाडे यांची होती.कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक स्मिता राऊत (कौशल्य विकास समिती अधिकारी) यांनी माननीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनखाली केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ.प्रेरणा मोडक,प्रा.संदीप देशमुख,प्रा. डॉ.सचिन चौधरी, प्रा. डॉ रामचंद्र वासेकर डॉ.पवार डॉ. वैराले, प्रा.सचिन वाकडे, प्रा.डॉ. मार्कंडेवार तसेच हरी भाऊ, नरेश अलाम,किशोर बोरकर यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!