खालसा कॉन्व्हेन्ट येथे वाढदिवस साजरा

आज 19 ऑगस्टला खालसा कॉन्व्हेन्ट महाकाली वार्ड चंद्रपूर येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन साहनी मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेतील उपमुख्याध्यापिका लिना वडियालवार आणि संगीता मांडेकर, ज्येष्ठ शिक्षक पोडे सर आणि बोधे मॅडम, सहायक शिक्षक, शिक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून वाढदिवस साजरा केला. केक कापून आनंद व्यक्त केला.
वाढिवसानिमित्त सर्वांनी बार बार दिन ये आये, आप जियो हजारो साल अस गान म्हणून मॅडमला खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि पुष्पगुच्छ देऊन मॅडमचे स्वागत केलं.
सहाय्यक शिक्षिका वर्षा येलचलवार यांनी मॅडमच्या जीवनशैलीवर आधारित कविता गायन केलं आणि त्यांना कविता भेट म्हणून दिली.
सर्वानी मॅडमला साडी भेट म्हणून दिली. वैभव मोडकवार यांनी पेन भेट दिली. मॅडमनी सर्वांचे आभार व्यक्त केले व आनंद द्विगुणित केला. साहनी मॅडम यांनी सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..