*विश्वशांती विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.७६ व्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव राजाबाळ पा.संगीडवार, उपाध्यक्ष अनिलभाऊ स्वामी,कोषाध्यक्ष डॉ.विजयराव शेंडे, सदस्य डॉ.चंद्रमौली, सदस्य रवल गड्डमवार,प्रशांतजी राईंचवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक अरुण राऊत, नगरपंचायतचे पदाधिकारी, माजी शिक्षक,ज्येष्ठ नागरिक व बहुसंख्य पालक उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या महत्वावर राजू केदार यांनी मार्गदर्शन केले.शालेय विद्यार्थ्यांनी या प्रसंगी भाषणे दिली. कार्यक्रमाचे संचालन धनंजय गुरनुले यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी मानले.



