Vidarbh24News

Latest Online Breaking News

*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी “नक्षा”चे प्रदर्शन*

*धेय वेढ़या तरुणाचा प्रयत्न *
मनात दृढ़ निश्चय आणि सकारात्मक कल्पना असेल तर योग्य शिखर गाठत येतोच,अशातच काही वेगळे करण्याचा प्रयत्न काही तरुणा मार्फत केला गेला आणि ” नक्शा ” चि निर्मिति झाली केवळ स्वप्न पाहून ते पूर्ण होत नसतात, त्यासाठी प्रयत्नाची गरज असते, काही काही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेडे व्हावे लागते, वेळ काढावी लागते आणि त्यातूनच मग स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो, अगदी परिस्थिती विपरित असली तरी, यश गाठता येते. यशस्वी होता येते. अशाच स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने वेडा झालेल्या मात्र प्रापंचिक व्यवसायातून वेळ मिळत नसतानाही, पाहीलेले स्वप्नपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणारा युवक म्हणजे प्रफुल्ल यलचलवार!
ग्रामीण भागात थिएटर उभे करणे म्हणजे साधी गोष्ट नाही,पुर्वी गाणे किंवा अभिनय करण्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर गाठावे लागत असे,संधी मिळण्याचा खुप प्रयत्न करावे लागत असत,त्याच सोबत या क्षेत्रातील प्रशिक्षण घ्यावे लागत असे,आर्केस्टा किंवा नाटकातून आपल्या कला.गुणांचे सादरीकरण केले जात होते,बदलत्या काळानुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या. माध्यमातून आपले.गाणे किंवा आपले रिल सोशल मीडियातील.यु ट्यूब, वाट्स अप,इंस्टाग्रामवर अपलोड करीत असतात, असेच एका ध्येय वेड्या तरुणांनी नक्षा स्वतः निर्माण करून त्याचे.प्रसारण . यु ट्युब वर.प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे,

चित्रपट निर्मीती म्हणजे, मुंबई!, चित्रपट निर्मीती म्हणजे लागणारा पैसा! मात्र प्रफुलने स्वत:चा चित्रपट तयार करण्यांचे स्वप्न पाहीले, आपल्या गावातीलच संवगड्यांना सोबत घेत, आपल्याच परिसरात शुटींग करीत एका नव्या चित्रपटाची निर्मीती केली आणि सिनेमाचे नांव ठेवले ‘नक्शा’
मूल परिसरातच शुटींग झालेले, आणि स्थानिक कलावंताना सोबत घेवून तयार केलेली शार्ट फिल्म नक्शाचे काम पूर्ण झाले असून, नुकतेच त्याचे ट्रेलरही युटयूबवर प्रदर्शीत करण्यात आले आहे. स्वातंत्रदिनांचे औचित्य साधत, येत्या 15 आॅगष्टला युटयूबवर नक्शा प्रदर्शीत होणार आहे.
श्री बाबा आर्ट अँड प्रोड्कॅशन निर्मित NAKSHA (An unexpected journey) हिंदी शॉर्ट फिल्मचे निर्देशक व निर्माता-प्रफुल एम.यलचलवार, लेखक-शुभम येवतकर, कलाकार चाईल्ड आर्टिस्ट कार्तिक कमलापूरवार, सह कलाकार प्रफुल एम.यलचलवार, शुभम येवतकर, मारोती जराते, गणेश मंथनवार, कुणाल गायकवाड, कु. कुमुद भोयर, प्रा.सरिता बुटले, धनंजय.पी.बद्देलवार, अमोल गेडाम, सचिन गेडाम, आशुतोष सादमवार व इतर सहकारी या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे,त्याच्या या महत्वाकांक्षी प्रयत्नेला.नक्कीच यश मिळेल यात शंका नाही, सदर नक्षा हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रदर्शित. होणार असून त्याच्या आस्वाद.घ्यावा. असे नक्षा टिम कडुन आवाहन.करण्यात येत आहे..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!