आठवडा भरापासून वनपरिक्षेत्रात धुमाकुळ घालणा ऱ्या गजराज्याचे सिंदेवाही परिक्षेत्राकडे पलायन …..
* शोध मोहीमें दरम्यान हत्तीचे दर्शन विरळ *
* उपक्षेत्र पाथरी , व्याहाळ मधे पाऊल खुनाचे दर्शन *
गेल्या आठवडा भरापासुन.सावली वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणा-या गजराजाने सिंदेवाही वनपरिक्षेत्रात पलायन केल्याची माहीती ,सावली वनविभागाकडुन प्राप्त झाली असून हत्तीचे सिंदेवा ही वन परिक्षेत्राकडे पलायन झाल्याची माहिती सावली वनविभाकड़ून प्राप्त झाली आहे
सावली तालुक्यातील पाथरी,व्याहाड खुर्द. भागात काही दिवसापासून हत्ती आल्याची चर्चा सुरू होती, या भागात हत्तीच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत, मात्र हत्ती बेपत्ताच होता, वनविभागाकडून शोध मोहीम सुरूच आहे,
सदर.हत्ती ब्रम्हपुरी रेंज मधून हळदा,उसरपाक चक मार्ग आलेला.आहे, गायडोंगरी गावाजवळील तलाव.परिसरात दिसल्याचे त्या गावातील प्रत्यक्ष दर्शीने वनविभागाला.सांगितले, त्यानंतर चकविरखल ,नवेगाव बिटातुन.तो.व्याहाड खुर्द उपवनात आला असुन.शेतशिवारात त्याच्या पाऊलखुणा दिसून येत आहे, खरीप हंगाम सुरू आहे ,आणि तालुक्यात नुकतेच रोवणी झाल्या असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे,
छत्तीसगड, मध्यप्रदेश मधून काही महिन्यापूर्वी मुरुमगाव.,धानोरा.मार्गे हत्तीच्या कळपाचे आगमन झाले होते,त्या मधुन भरकटलेला सदर.हत्ती.असल्याचे. वनविभागाकडून सांगितले.जात आहे, तालुक्यात पहिल्यांदा हत्तीचे.दर्शन झाल्याने वनविभागाकडूनमोठ्या प्रमाणात. शोध मोहीम राबविली जात.आहे,या शोधमोहीमे नुसार सदर हत्ती हा सावली वनपरिक्षेत्रातुन तो लगतच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात गेल्याची माहिती वनविभागाकडून सांगितली जात आहे, अशा जंगली हत्तीमुळे शेतपिकासह नागरिकांना सुध्दा धोका असल्याचे बोलले जाते,
वनविभागाने या जंगली हत्तीचा त्वरीत शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी, वनविभागाकडे केली जात आहे दरम्यान तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या उप क्षेत्र पाथरी आणि व्याहाळ या भागातील काही गावात हत्तीच्या पाऊल खुना निदर्शनास आल्याची चर्च्या असून त्या आधारावर वनविभागाने तापासकार्य सुरु केले असता वनविभागाच्या निदर्शनास गजराज आल्याचे निष्पन्न होऊ शाकले नाही परिणामी गजराज सावली वनपरिक्षेत्र सोडून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात पलायन झाल्याची माहिती वन विभागाकड़ूं प्राप्त झाली आहे एकिकडे वन्य हिंस्र पशुचे वाढते हल्ले त्यातही गजराज्याचा धुमाकुळ आदि कारनास्थव सावली वनपरिक्षेत्र चर्चेत असून सावली वनपरीक्षेत्रात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ……



