स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला बालविवाह विरोधात विविध कार्यक्रमाचे आयोजन
*बाल विवाह करणार नाही व होऊ देणार नाही अशी शपथ यावेळी गावकऱ्यांनी घेतली.*
रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन, (रुदय )गडचिरोली द्वारा असेस टु जस्टिस प्रकल्प, चंद्रपूर च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात बाल विवाह मुक्त भारत अभियान राबवित आहे. त्यासोबतच बालकाचे लैंगिक शोषण, बाल विवाह, बाल तस्करी तसेच बाल कामगार आदी समस्याग्रस्त बालकांसाठी मदतीचे व पुनर्वसनाचे कार्य सदर संस्थेच्या माध्यमातून करीत आहे,स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर जिल्ह्यातील गावांमध्ये व शाळांमध्ये प्रभात फेरी , स्लोगन व सभा घेऊन बाल विवाह विरुद्ध जनजागृती करण्यात येत आहे.
बालविवाह विरोधातील ही जनजागृती मोहीम नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित आणि जगप्रसिद्ध बाल हक्क कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच्या आवाहनावर चालवली जात आहे.

देशवासीयांना एकत्र येऊन बालविवाह मुक्त भारत करण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या आवाहाणावर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला देशभरातील स्वयंसेवी संस्था एकत्रितपणे बालविवाह विरोधात संयुक्त मोहिम राबवत आहेत.
यावेळी रुरल अर्बन अँड डेव्हलपमेंट युथ असोसिएशन, (रुदय) गडचिरोली चे संचालक आदरणीय काशिनाथ देवगडे यांनी म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या 75 वर्षात आपण खूप प्रगती केली आणि अनेक यश मिळवले पण आजही बालविवाह सारखे सामाजिक दुष्प्रवृत्ती देशाच्या कपाळावर कलंक आहे. देशाला सशक्त बनवून प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी मुलींची सुरक्षा आवश्यक आहे गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि बालविवाह निर्मूलनासाठी विविध योजना आणि धोरणात्मक बदल करून अनेक पावले उचलली असली तरी समाजालाही आपली भूमिका पार पाडावी लागणार आहे. समाज प्रबोधन आणि लोकांच्या सहकार्यानेच मुलांचे बालपण हिरावून घेणारे हे दुष्प्रवृत्ती नष्ट होऊ शकते.
सदर कार्यक्रमाला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच बाल कल्याण समिती अध्यक्षा ॲड.क्षमा बासरकर, सदस्या ॲड.अमृता वाघ, ॲड. वसुधा भोंगळे, सौ.वनिता घुमे, डॉ. ज्योत्स्ना मोहितकर व आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.



