भरधाव वेगाने दुचाकीस्वार जागीच ठार
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळच्या पथकर नाक्या जवळ आज दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० च्या सुमारास दुचाकीस्वाराचे भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना त्यचे नियंत्रण सूटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला मोटरसायकल ची जोरदार धडक बसली. व जागीच ठार झाला सदर दुचाकीस्वाराचे नाव विनायक कोरांगे रा. महादवाडी वय अंदाजे ४५ वर्षे असे आहे. सदरची माहिती प्राप्त होताच सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले सदर इसम सबंधित परिसरातील रहिवासी असल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत .