किसान विद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

आज दिनांक ८ऑगष्ट २०२३ ला किसान विद्यालय जेप्रा येथे ९ ऑगष्ट, जागतिक आदिवासी दिन तसेच ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. आदिवासी गीत गायन तसेच दिनविशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थींनींनी आदिवासी गीत सादर केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष विलास मेश्राम, मार्गदर्शक अरविंद ऊरकुडे, गुरुदेव चापले, खुशाल दुमाने यांनी दिनविशेष मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, आभार चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले.