*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४९ जयंती साजरी*
सावली : भारतीय आरक्षणाचे जनक, रयतेचे राजे, राधानगरी धरण प्रकल्पाचे जनक, बहुजन प्रतिपालक, उत्कृष्ट मल्ल पट्टू, लोकनायक, कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त अभिवादनपर सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मा.आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय, सावली येथे आयोजित करण्यात आला होता.या वेळी महाराजांना पुष्पहार-फुले अर्पण करून त्यांचा नावाचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले.*
*अभिवादनपर कार्यक्रमाला सावली नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.लता लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष सौ.अंजली दमके, सावली महिला काँग्रेस शहराध्यक्ष सौ.भारती चौधरी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोनपत्तीवार, बांधकाम सभापती सौ. साधना वाढई, पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर,नगरसेवक मा.प्रीतम गेडाम, प्रफुल वाळके, नगरसेविका सौ.ज्योती गेडाम, सहकारी सोसायटी व्यवस्थापक मा.आकाश खोब्रागडे,मा.आकाश बुरीवार तसेच काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कमलेश गेडाम,अत्तदीप घडसे, बादल गेडाम आदी गावकरी उपस्थित होते.*



