Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली बसस्थानकाची दुर्दशा

बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत सावली बसस्थानकाचा फोटो
सावली बस स्थानकाचे उद्घाटन तत्कालीन मदत, पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते घाईगडबळीने करण्यात आले. संपुर्ण बसस्थानक परिसरात डांबर किँवा सिमेंट काँक्रिटचे बेड न टाकता समोर पावसाळ्यात काय अवस्था होईल याचा विचार न करता उद्घाटन करून बसस्थानक प्रवास्यासाठी मोकळे केले.

महाराष्ट्र सरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा २०२३- २४ सुरू करण्यात आले त्या स्पर्धेच्या बॅनर वर स्पष्ट दिसेल असा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो व त्याखाली सावली बसस्थानकाचा फोटो लावण्यात आला होता हे विशेष.


या स्पर्धेच्या सर्व बॅनर, फ्लेक्स किँवा जे जे प्रसिध्दी साठी साधनांचा वापर केला गेला त्या सर्व ठिकाणी तसेच वेव पोर्टल, दैनिक वृत्तपत्रात जाहिरात आणि बातम्या प्रकाशित करण्यात आल्या तिथे प्रत्येक ठिकाणीं सावली बसस्थानकाचे फोटो आवर्जून लावण्यात आले.
आता पावसाळ्याला सुरवात झालेली आहे पहिल्याच पावसात सावली बसस्थानकाची अशी अवस्था झालेली आहे की, प्रवाश्यांना दुरूनच पाहून बसस्थानकात प्रवेश करायची इच्छा होत नाही आणखी पुर्ण पावसाळा शिल्लक आहे.


बसस्थानकाला सुरवातीलाच असा मोठा बॅनर झळकताना दिसतो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा २०२३- २४ या बॅनरकडे पाहून हसू येते.
बसस्थानकाची अवस्था पाहून प्रवास्यांनी लवकरात लवकर डांबर किँवा सिमेंट काँक्रिटचे बेड बसस्थानक परिसरात टाकून परिसर दुरुस्त करावा अशी मागणी करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!