Vidarbh24News

Latest Online Breaking News

भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात 27 जून पासून संदीप मेडपल्लीवार यांचे आमरण उपोषण*

सावली:प्रा.शेखर प्यारमवार

सावली येथील भूमापन क्रमांक २२९ या गटाच्या सातबारा अभिलेखावरील मधुकर केशव मेडपलिवार यांचा नावाचे आराजीची नोंद घेण्याकरिता दिनांक २८/०७/ २०१९ ला अर्ज सादर करण्यात आलेला होता मात्र चार वर्षाच्या कालावधी लोटूनही उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जाणीव पूर्वक दुर्लक्षित पणा मुळे न्याय मिळाले नाही त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमरण उपोषण करत असल्याच्या इशारा यावेळी संदीप मेडपलीवार यांनी दिलेला आहे.

सावली येथील भूमापन क्रमांक २१९ या गटाचा सातबारा वर मधुकर केशव मेडपल्लीवार यांचे नोंद होते त्यानंतर सदर असलेली नोंद ही त्यांच्या नावाने करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करिता दिनांक २९/०७/२०१९ला या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सावली ला अर्ज सादर करण्यात आले. मात्र तेव्हापासून संबंधित अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष केले. संबंधित अर्जदार संदीप मेडपल्लीवार हे प्रत्येक महिन्याला संबंधित कार्यालयामध्ये जाऊन आम्ही दिलेल्या अर्जाचा काय झालं? या संदर्भात विचारणा केली मात्र त्यांना अद्यापही थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारत असल्याचा प्रकार दिसून आला.

त्यामुळे चार वर्षापासून त्यांना अनेक शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागलेले आहे त्यांना त्यांच्या शेतात पिकांची पिके सुद्धा बुडलेली होती मात्र त्याच्या सुद्धा लाभ त्यांना मिळालेला नाही.आमची जागा आमच्या नावे चढवून देण्यास दिरंगाई संबंधित विभाग करीत आहे. त्यामुळे दिनांक २७/०६/२०२३ पर्यंत आम्हाला आमच्या नावाची जागा नावे न केल्यास परिवारासह कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांनी उपाधीक्षक कार्यालयाला दिलेले आहे.यावेळी संदीप मेडपल्लीवार त्यांची पत्नी हर्षला मेडपल्लीवार व आई विमल मेडपल्लिवार हे निवेदन देताना उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!