Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावली हरांबा रस्ता पावसाळ्यात अगोदर दुरुस्ती करावे – उमेश गोलेपल्लीवार

सावली :प्रा.शेखर प्यारमवार

सावली ते हरांबा या रस्त्यावर लोढोंली, साखरी, सिर्शी, देवटोक, पेडगाव, जिबगाव, उसेगाव,सिंदोळा इत्यादी गांवे येत असून या गावातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरीक शेती व शेतीपुरक कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसाय तसेच शिक्षणाकरीता या रस्त्याने ये-जा करतात. व
या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडून गिट्टी उखळलेली असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना खुपच आर्थीक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. शाळकरी मुलांना आणि गर्भवती महिलांना तर भयंकर त्रास होतो. या रस्त्यावर गिट्टी उळखून मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अपघात झालेले असून अनेकांनी प्राण गमावले आहे. हा मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना प्रशासन या मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग दुरुस्त करुन सुरळीत करुन देण्याचे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांनवर व लोकप्रतिनिधी बद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेले आहे पावसाळा येण्यापुर्वीच हा रस्ता दुरुस्त करुन डांबरीकरण होईल अशी या परिसरातील ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र प्रशासनाच्या चालढकलपणामुळे व दप्तर दिरंगाईपणामुळे व लोकप्रतिनिधी आमदार यांचे दुर्लक्ष असलेल्या मुळे परिसरातील नागरिक नाहक त्रास सहन करत या रस्त्यावरुन प्रवास करीत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे सदर रस्त्याच्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन व संबंधित विभागाने याची उचित दखल घेऊन लवकरात लवकर सावली ते हरांबा रोड दुरुस्ती करून द्यावे अशी मागणी जनसेवा न्यूज मुख्य संपादक उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!