रुदय सामाजिक संस्थाने अडवला बालविवाह
रुदय सामाजिक संस्थेला दिनांक 28 मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजा भेजगाव तहसील मुल जिल्हा चंद्रपूर येथे होणाऱ्या बालविवाहाची माहिती मिळाली त्यानुसार कैलास संत्यार्थी चिल्डेन्स फाउंडेशन अमेरिका यांच्या असेस टु जस्टिस प्रकल्पाअंतर्गत रुदय सामाजिक संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर स्वयंसेवी संस्था अध्यक्ष शशिकांत मोकाशे चंद्रपूर जिल्हा चाईल्ड लाईन अभिषेक मोहुले आणि मुल पोलीस स्टेशन सी डब्ल्यू पी ओ खाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजा भेजगाव येथील होणारा बालविवाह थांबविण्यात आला. यामध्ये स्थानिक प्रतिष्ठित नागरिक गावातील पाटील व अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेण्यात आले सदर कुटुंबातील सदस्य यांना सत्यार्थी फौंडेशनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात आले आणि त्यांना मार्गदर्शन करून पुढील कारवाई करिता आज दिनांक 29/5/2023 रोजी बाल कल्याण समिती समोर उपस्थित राहण्यास सांगितले.



