रमाबाई आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम …….
सावली ( लोकमत दुधे/बाबा मेश्राम )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावली व्दारा संचालित रमाबाई आंबेडकर कनिष्ठ कला महाविद्यालयाचे एच.एस.सी.फेब्रुवारी २०२३ करिता प्रविष्ठ झालेल्या १०३ विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.२% निकाल देऊन कला शाखेमधून सावली तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधुन कु.भाग्यश्री पुरुषोत्तम कुकुडकर हिने ४८४ गुण घेऊन प्रथम टक्केवारु८०.६७%,अंकुश नरेंद्र गेडाम याने४६९गुण घेऊन व्दितीय टक्केवारी ७८.१७%कु..पुजा विलास बाबनवाडे हिने ४६४ गुण घेऊन तृतीय टक्केवारी ७७.५०%तर कु .सुरक्षा हिम्मतलाल कोसरे हि विद्यार्थ्यीनी ४६४ गुण टक्केवारी ७६.८३% मिळवुन चवथ्या क्रमाकांची मानकरी ठरली.
प्राविण्य श्रेणीत ४, प्रथम श्रेणीत३९, व्दितीय श्रेणीत४८पास श्रेणीत११ विद्यार्थी येऊन महाविद्यालयाच्या निकालात मानाचा तूरा रोवून महाविद्यालयाला तालुक्यामधून कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळवून दिला
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सर्व विषयांचे प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एल.शेडे,तसेच मंडळातील सर्व संचालक यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यामुळे उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एल.शेंडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे,संस्थाध्यक्ष .के.एन.बोरकर ,सचिव व्ही.सी.गेडाम, संचालक बि.के.गोवर्धन सौ.सी.आर.गेडाम.व्हि.के.बोरकर,.डी.बी.गोवर्धन .यु.एम.गेडाम सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरभरुन कौतुक करुन अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस सुभेच्छा दिल्या …….



