“शासन आपल्या दारी” योजना प्रत्येकाच्या दारी पोहोचणार

एमकेसीएलच्या ‘महालाभार्थी’ पोर्टलची साथ
मुंबई : शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टल सुरू करण्यात आले. या पोटर्लद्वारे गावागावात कल्याणकारी योजना पोहोचविण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरू असून एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत, अशा रितीने याची योजना करण्यात आली. आता याशिवाय महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर घेऊ शकणार आहेत.
एमकेसीएलने ”महालाभार्थी’ हे पोर्टल तयार केले आहे. नागरिकांनी या पोर्टलमध्ये स्वतःची माहिती सादर केल्यानंतर कोणत्या शासकीय योजनासाठी हा नागरिक पात्र ठरू शकेल याची एक संभाव्य यादी उपलब्ध होते. प्रत्येक योजनेसाठी कोठे संपर्क साधावा, कागदपत्रे कोणती लागतात याचीही माहिती नागरीकांना मिळते.
अशी होणार कार्यवाही
जिल्ह्यातील एमएससीआयटी केंद्र, सीएससी केंद्र, इतर संगणक प्रशिक्षण केंद्रांना यासाठी प्राधिकृत करण्यात येईल. महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करून लागू होणाऱ्या शासकीय योजनांची माहिती विनामूल्य मिळवू शकतील. नोंदणीसाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकास केंद्राद्वारे अर्जाचा छापील नमुना दिला जाईल. नागरिकाने स्वतः किवा स्वयंसेवकाच्या मदतीने हा अर्ज आधार क्रमांकाच्या आधारे महालाभार्थी पोर्टलवर नागरिकाचे खाते तयार करण्यात येईल. संबंधित केंद्राच्या प्रमुखाला महालाभार्थी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. पोर्टल वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल.
स्वयंसेवक करतील मदत
नागरिकांना प्राधिकृत केंद्रावर जाण्यास प्रोत्साहन देणे, छापील अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मदत करणे, केंद्रात येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी प्रयत्न करणे. योजनांची माहिती देणारे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मदत करतील.
पोर्टलवरुन पत्र
भरल्यानंतरपोर्टलद्वारे संबंधित नागरिकास लागू होणाऱ्या संभाव्य योजनांची माहिती देणारे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार करून या पत्राची प्रत नागरिकास देण्यात येईल. हे पत्र घेऊन नागरिक संबंधित कार्यालयात जाऊन, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता होईल.