तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या व्यक्तीवर रानडूकराचा हमला

गडचिरोली शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरवडा येथील पांडुरंग मोहुर्ले वय ६५ वर्षे आज सकाळी तेंदुपत्ता संकलनासाठी गेले असता रानडूकराने त्याच्यावर मागून हल्ला चढवला त्यात ते गंभीर जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे साधन नसल्यामुळे उन्हाळाच्या दिवसात लोक तेंदूपत्ता संकलन तर हिवाळ्यात मोहफूल संकलन असे काम करीत असतात. मात्र जंगली प्राण्यांचा वावर जास्त असल्यामुळें कधी रानडुक्कर तर कधी वाध, बिबट्याचे हमले होत असतात. त्यातलाच एक प्रकार पांडुरंग मोहुर्ल यांच्यावर झालेला आहे. रानडूकराने हमला केल्यामुळे गंभीर जखमी झाले.
पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.