सावलीची राशी सुरमवार सीबीएससी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
*सावलीतील तीन विद्याथ्र्यांचे सुयश*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
आज सीबीएससी १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला.चंद्रपूर येथील नामवंत नारायणी विद्यालय,चंद्रपूर येथे १२ वी ची परीक्षा देऊन सावली तील तीन विद्यार्थ्याने यश प्राप्त केले.त्यात राशी प्रवीण सुरमवार हिने ९६.६० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम स्थान पटकाविले. तर अथर्व आनंद बेजगमवार याने ९३ टक्के गुण मिळवून प्रावीण्य प्राप्त केले तसेच अथर्व सुरेश (नाना) विरमलवार याने ८२ टक्के गुण मिळवून प्रावीण्य संपादन केले.यश प्राप्त केलेले तीनही विद्यार्थी बीबीए तून शिक्षण घेणार आहेत हे विशेष..
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई,वडील,आणि विद्यालयातील शिक्षक वृंदांना दिले.
यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सावली परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया सावली तालुका तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



