Vidarbh24News

Latest Online Breaking News

*न्यायिक हक्कासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकाराचे सावलीत आंदोलन*

*११ मे ला संपूर्ण भारतात होणार आंदोलनं*
सावली:प्रा शेखर प्यारमवार
उद्या दि. ११ मे २०२३ ला संपुर्ण भारतात पत्रकारांचे त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आंदोलन होणार असून सावली येथेही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, यांना तर तहसीलच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालया समोर ३ तासाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर धरणे आंदोलन खालील मागण्यासाठी करण्यात येत आहे.
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावे.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेली जीएसटीची अट रद्द करावी.
४) पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकां इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना देशातील पत्रकारांच्या हितासाठी आणि न्याय्य हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या समस्या निकाली काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.संपूर्ण देशात पहिल्यांदाच पत्रकारांच्या हितासाठी आंदोलन होत आहे हे विशेष.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!