Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

*महावीर इंटरनॅशनल सेंटर चा उपक्रम*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीच्या वतीने दिनांक ३० एप्रिल २०२३ ला जिल्हा परिषद शाळा सावली येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
*जन सेवा हीच ईश्वर सेवा* या भावनेतून महावीर इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून सावली परिसरात मानवतेचे दर्शन घडविणारे अनेक सामाजिक उपक्रम मागील पाच वर्षापासून अविरतपणे राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबिरात बी.पी., सुगर, रक्त तपासणी, फिजिओथेरेपी संपूर्ण आरोग्य तपासणीचा २०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला.


शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालय सावली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास वाघधरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश रेंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री अवघड, तंत्रज्ञ सचिन भोयर, समुपदेशक ओमप्रकाश वाकडे, परिचारिका पल्लवी मडावी, निशा कोसमशिले तसेच सावली नगरीतील प्रसिद्ध डॉ.विजय शेंडे, डॉ.कर्मवीर गोबाडे डॉ.गोबाडे वैद्यकीय अधिकारी जिबगाव,डॉ.सुरेश कांदे, डॉ.अभिजीत गेडाम वैद्यकीय अधिकारी जिबगाव तसेच बीपिएचटी/फिजिओथेरेपी डॉ.जी.एस.तागडे पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच जिल्हा परिषद शाळा,योग नृत्य परिवार यांचे विशेष सहयोग लाभले.

आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.या शिबिराला सावली परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे अध्यक्ष मनोज ताटकोंडावार, सचिव राहुल मेरुगवार, प्रकाश खजांची, प्रफुल बुटे, संत प्रकाश शुक्ला, अशोक पोटवार, प्रा,अरुण राऊत, जगदीश बंन्सोड, किशोर संगीडवार, राजेश रक्षणवार, अजय पोटवार, प्रवीण झोडे, प्रा.शेखर प्यारमवार ,किरण आकुलवार, अजय पोहनकर, रवींद्र ताटकोंडावार, अमोल तिगलवार ,विनोद बांगरे महेश चौधरी,आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिराला सावली परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!