Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रसंतानी सांगितलेले समतेचे विचार देशात पोहचवा…..संत.मुर्लीधर स्वामी महाराज

* ग्रामजयंती निमित्ताने रुग्णांना फळे वाटप *
* गुरुदेव सेवा मंडळ सावलीचा उपक्रम *
सावली ( लोकमत दुधे )
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे गावगखेड्याचा विकास करणे, शाळा बांधणे सोबतच जाती, धर्म,पंथ असा विचार न करता सर्व लोक समान आहेत, बंधुभावाने राहणे व सर्वात समता आहे असे ते सांगत त्यामुळे राष्ट्र संतांनी सांगितलेले समतेचे विचार देशात पोहचवा असे मार्गदर्शन संत मुर्लीधर स्वामी महाराज यांनी केले,ते ग्रामजयंती महोत्सवाच्या पर्वावर सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने। आयोजित कार्यक्रमात बोलत होते,
तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस “ग्रामजयंती ‘म्हणून साजरा करण्यात येत आहे, या निमित्ताने मंडळाचे सदस्य यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, व रुग्णांना फळासोबत भजनाचे व सक्रिय पाठाचे वह्या देण्यात आल्या. यावेळी माननीय संत मुरलीधर महाराज हरणघाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख ,पत्रकार लोकमत दुधे , पत्रकार बाबा मेश्राम , प्रीतम देवगड़े , प्रकाश लोनबले , जाणीवंत घोडमारे, रमेशजी बोरुले, सुधाकर गाडेवार विनोद बांगरे, मुक्तेश्वर राजूरकर,संजय भाऊ मेश्राम, प्रभाकर गाडेवार , बंडुजी मेश्राम, डॉ. गुरनुले दिलीपभाऊ येलकेवार, भाविकाताई मुळे, इंदिराताई राऊत, हजारें ताई व बराच महिलावर्ग यावेळी उपस्थित होते,इतर सर्व तालुक्यातील गुरुदेव सेवकांच्या सहकार्य यावेळी लाभले
या कार्यक्रमांमध्ये माननीय डॉ.देशमुख यांनी ग्रामगीता भेट देण्यात आली, तसेच सोबत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा दवाखान्यामध्ये देण्यात आल्या. व मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
यावेळी सर्वधर्म समभाव ,बंधुभाव, समता या राष्ट्रसंतांच्या विचाराची देशालाच नव्हे तर विश्वाला गरज आहे.तसेच गावागावात शाळा.उघडा,झाडे लावा. सोबतच राष्टसंतानी दिलेल्या समतेच्या शिकवणीला विसर पडत आहे ,गुरुदेव सेवा मंडळानी ऐकाप्याने काम करुन विचार पुढे न्यावे,यावर बोरुले दादा,घोडमारे दादा आणि डॉक्टर देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बांगरे यांनी केले. तर प्रास्ताविक संजय भाऊ मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मुक्तेश्वर राजूरकर यांनी केले.आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व सावली व मूल तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार माणण्यात आले ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!