Vidarbh24News

Latest Online Breaking News

रुग्णांना फळे वाटप करून केली ग्रामजयंती साजरी*

सावली: प्रा.शेखर प्यारमवार
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ सावली तालुका यांच्या विद्यमाने ग्रामजयंती महोत्सवाच्या पर्वावर सावली येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे सेवकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, व रुग्णांना फळासोबत भजनाचे व सक्रिय पाठाचे वह्या देण्यात आल्या. यावेळी संत मुरलीधर महाराज हरणघाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, जाणीवंत घोडमारे, रमेशजी बोरुले, सुधाकर गाडेवार,विनोद बांगरे, मुक्तेश्वर राजूरकर,संजय मेश्राम, प्रभाकर गाडेवार , सुधाकर कोलप्याकवार,बंडुजी मेश्राम,डॉ.गुरनुले,दिलीप येलकेवार, भाविकाताई मुळे, इंदिराताई राऊत, हजारेंताई व मोठ्या संख्येने महिलावर्ग इतर सर्व तालुक्यातील गुरुदेव सेवकांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये डॉ.देशमुख यांना ग्रामगीता भेट देण्यात आली, तसेच सोबत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा दवाखान्यामध्ये देण्यात आल्या. व मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
गावा गावाशी जागवा,भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे! सर्वधर्म समभाव ही राष्ट्रसंतांच्या विचाराची देशालाच नव्हे तर विश्वाला गरज आहे. असे मत संत मुरलीधर महाराज यांनी मांडले.तसेच ग्राम जयंती च्या महत्वावर रमेश बोरुले,जनिवांत घोडमारे आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.देशमुख यांचेही मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बांगरे यांनी केले. तर प्रास्ताविक संजय मेश्राम यांनी केले तर आभार प मुक्तेश्वर राजूरकर यांनी मानले.
आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व सावली व मूल तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!