बोथली येथे भीमजयंती उत्साहात साजरी
बोथली: परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने बौध्द समाज कमिटी बोथली चे वतीने दोन दिवसीय जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
दि. १३ एप्रिल रोज गुरुवार ला दुपारी ०१ वाजता सामाजिक प्रोबोधन कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात झाली.
संध्याकाळी ५ ते ८ वा. पर्यंत संपूर्ण ग्रामवासीयांकरिता भोजन दान देण्यात आले ,
रात्रौ ९ ते १२ पर्यंत बुद्ध-भीमगितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला .
दि. १४ एप्रिल ला सकाळी ९ ते १२ वा. पर्यंत मुख्य समारंभ पार पडला.
सदर समारंभात ग्रामपंचायत कमिटी व इतर ग्रामस्त बहुसंख्येने उपस्थित होते.
संध्याकाळी ०७:०० ते ११ वा. पर्यंत संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने मिरवणूक काढण्यात आली.
सदर मिरवणुकीत ग्रामस्त बहुसंख्येने सहभागी होते.
वरील संपुर्ण कार्यक्रमात ग्रामपंचायत कमिटी व गावकऱ्यांचा उत्सुर्त प्रतिसाद व मदत मिळाल्याने बौद्ध समाज कमिटीने समस्त गावकऱ्यांचे आभार मानले.



