अंगणवाडी सेविका मदतनिसच्या २१ जागेसाठी २७३ अर्ज
‘अंगणवाडी सेविका, मदतनिसपद भरती प्रक्रीया’ ‘तालुक्यात १७० अगंणवाडीचा समावेश
‘सावली शहरात २ मदतनिस साठी ४४ अर्ज ‘
सावली : एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत
सावली तालुक्यात नुकतीच अंगणवाडी सेविका मदतनिस या
पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आवेदन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अंगणवाडी सेविका, मदतनिस अशा तालुक्यातील २१ जागेसाठी २७३ आवेदन अर्जाची नोंद झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.
० ते ६ वयोगटातील बालकांना सुदृढ व सशक्त व बलशाली राष्ट्राच्या निर्मीती साठी एकात्मीक बाल विकास प्रकाल्पाची निर्मीती करण्यात आलेली असुन त्याद्वारे अंगणवाडी केंद्राची निर्मीती करण्यात आलेली आहे. यानुसार बालकांना सुदृढ बनविण्या बरोबरच पुढील शिक्षणाची आवड निर्माण करण्यात येत असते.
तालुक्यात १७० अंगणवाड्या असुन अनेक अंगणवाड्यात कुठे सेविकाएतर कुठे मदतनिस अशा जागा रिक्त होत्या. त्यामुळे कुठे मदतनिसला तर कुठे सेविकांना ईतरही अंगणवाड्यचा भार सोपविला गेल्याने बालकांच्या पोषण आहार व शिक्षणाची मोठी गैरसोय निर्माण
सदर जागेच्या भरती प्रक्रियेत १५ मार्च ही अर्जाची शेवटची तारीख होती तर १२ एप्रिल ला यादी प्रकाशित तर २७ एप्रिल ला अंतिम यादी प्रकाशित होणार असून भरती प्रक्रियेचा कार्यक्रम संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर भरती प्रक्रीयेत ईयत्ता १२ नंतर पदवी, पदव्युत्तर डिएड. बीएड आदी तत्सम शिक्षण अर्हता ग्राह्य धरण्यात आली असून या पदभरतीसाठी अनेक उच्च शिक्षा विभुषित महिलांनी अर्ज दाखल केले आहेत.
होत होती. परिणामी याचा भार अंगणवाडी सेविका मदतनिसांवर पडत असल्याने बालकांचे आरोग्य शिक्षण व कार्यालयीन भार, यामुळे अंगणवाडीत शिक्षण व पोषण आहार याकडे दुर्लक्ष होत होते. याकरीता तालुक्यात नुकतीच सेविक आणि मदतनिस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असुन शेवटच्या दिवसापर्यंत २१
जागेसाठी २७३ अर्ज दाखल झाले. तालुक्यात भारपायली; सेविका १३ राजोली. फाल, सेविका ९, हिरापुर सेविका १७ तर व्याहाड खुर्द, मदतनिस १३, पाथरी २१, चक विरखल १०, गेवरा तुकुम ७, निफद्र २०, रुद्रापुर ३, जांब बुज १०, बोथली २०, केरोडा २२, सावली ४४, भट्टी जांब ४, लोंढोली ६, पांढर सराड ७, साखरी ५ करगांव १९, निल पेठगाव १२, मेहा बुज ११ असे तालुक्यातील विविध गावातील अंगणवाडी केंद्रासाठी मदतनिस आणि सेविकांचे एकुण २७३ अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सावली मुख्यालयातील अंगणवाडी केंद्र क्र ५ आणि ९ येथील मदतनिस या दोन जागेसाठी तब्बल ४४ अर्ज दाखल झाले आहेत.



