राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात भाषा व सामाजिकशास्त्र संशोधन कार्यशाळा

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर, येथे मानव्यविद्या शाखा व गुणवत्ता हमी कक्ष(IQAC) च्या वतीने भाषा व सामाजिकशास्त्र संशोधन कार्यशाळा दिनांक 14 मार्च 2023 रोज मंगळवारला पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. संजय गोरे व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ याच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे हे होते तर प्रमुख अतिथी डॉ.अनिता वाळके, प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल हे होते. ‘भाषा व साहित्याचे संशोधन’ या विषयावर साधन व्यक्ती डॉ. गजानन कोर्तलवार , मराठी विभाग प्रमुख, ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव यांनी मार्गदर्शन केले .

डॉ. संजय गोरे यांनी उद्घाटकीय व सामाजिक शास्त्राचे संशोधन यावर विचार व्यक्त केले सोबतच त्यांची नुकतीच गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला तर डॉ. अनिता वाळके यांनीही संशोधन पद्धती वर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. गजानन कोर्तलवार यांनी भाषा व साहीत्याचे संशोधन या विषयाची मांडनी करताना भाषा व साहित्य हे मानवी जीवनाचं अविभाज्य भाग आहे . बोलीभाषेतील संशोधन मानवी परंपरा , मूल्य याचा संशोधन करणारी प्रक्रिया असून आज बोलीभाषेतील संशोधनाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे. अनेक बोली आणि भाषा लुप्तप्राय होण्याच्या मार्गावरअसताना आपल्या सांस्कृतिक संचितांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी बोलीभाषेतील संशोधन महत्त्वपूर्ण आहे.
डॉ.अशोक खोब्रागडे अध्यक्षीय भाषणातून संशोधनाचे महत्त्व सांगून संशोधनाच्या पद्धती व दिशा सांगितल्या या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. प्रशांत वासाडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन किशोर बोरकुटे तर आभार महानंदा भाकरे यांनी मानले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिवाकर उराडे, प्रा. राहुल गुरूनुले , प्रा. चंदा पिसे, प्रा. कुंदा बोरूले यांनी सहकार्य केले.
सामाजिकशास्त्र संशोधन कार्यशाळा