राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात महिला कायदेविषयक मार्गदर्शन

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महिला विषयक कायदे या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे होते त्यांनी आपल्या भाषणातून महिलांनी अधिक शिक्षण घेऊन सक्षम व्हावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक एडवोकेट आंबटकर यांनी महिलांकरता असणारी विविध कायदे त्यात पुनर्विवाह कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा ,महिला संरक्षण कायदा, वारसा कायदा, संपत्तीचा कायदा इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रा. महानंदा भाकरे यांनी महाविद्यालयीन परिसरामध्ये लैंगिक छळाचे जर प्रश्न उपस्थित झाले तर ते सोडविण्याकरिता महाविद्यालयामध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याची रचना, कार्य याविषयीची माहिती सांगितली.
तसेच या कार्यक्रमाचे संचालन कुमारी सरिता पोटे हिने केले तर आभार कुमारी मानसी नायबनकर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रशांत वासाडे, डॉ. रामचंद्र वासेकर डॉ. दिवाकर उराडे, प्रा.विनोद बडवाईक, प्रा.राहुल गुरनुले , प्रा. कुंदा बोरले ,डॉ. प्रफुल्ल वैराळे, डॉ. विजयसिंग पवार, प्रा. सगानंद बागडे इत्यादी मंडळीनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.