राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात महिला दिन साजरा
*गरीब व आत्मनिर्भर महिलांचा सत्कार*
प्रतिनिधी:सावली:चंद्रशेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली दिनांक आठ मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सावली गावातील विधवा परंतु आत्मनिर्भर महिला ज्या बिकट परिस्थितीला सामोरे जात आत्मनिर्भर होऊन आपल्या परिवाराला आधार देत समाजात स्वावलंबी जीवन जगत आहेत अशा महिलांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती प्रणाली दुधबळे कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग सावली ह्या उपस्थित होत्या. मंचावर कार्यकारी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर राजश्री मार्कंडेवार आणि महिला तक्रार निवारण केंद्र प्रमुख प्रा. सौ. भाकरे उपस्थित होत्या.
समाजात स्त्री-पुरुष असमानतेची दरी कमी करण्याची गरज आहे. सावलीतील आत्मनिर्भर महिलांकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. परिस्थिती काही असो खासून न जाता निश्चयाला सामोरे जावे. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मधून डॉ.राजश्री मार्कंडेवार यांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमात श्रीमती रजनी दरडे,श्रीमती मंजुळा मांदाळे, श्रीमती चित्रा मांदाळे, श्रीमती मोती प्रभा मानकर या सर्वांचा साडीचोडी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रणाली दुधबळे यांनी स्त्रियांचे प्रश्न व समाजात वावरताना एकमेकांना साथ देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून theme digit all technology and innovation for gender equality या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थी रोहित शेंडे आणि प्रणाली दंडावार यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांनी आजच्या युगात स्त्री- पुरुष समानता आणि त्यावरील उपाययोजना यावर विचार मांडले त्यांनी लिंगभेद न बाळगता आपले ध्येय गाठण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन निराशा गुरनुले तर आभार तनवी मुनघाटे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ.किरण कापगते,डॉ.रागिने पाटील, प्रा.मुकेश निखाडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.



