विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
*जागतिक महिला दिनाचे औचित्य*
*राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जि. प. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत हिरापूर यांचा पुढाकार
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला मंडळ,जिल्हा.प.प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत हिरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *एक दिवस महिलेचा, तिच्या हक्काचा … तिच्या सन्मानाचा* या अभियाना अंतर्गत सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे व प्रीतीताई नितीन गोहने, सरपंच हिरापूर यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, एकलनृत्य स्पर्धा,समूहनृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. वक्तृत्व स्पर्धेचां विषय : “भारतातील थोर महिलांचे जीवन व कार्य” आहे.
वरील सर्व कार्यक्रम हे जिल्हा परिषद शाळा , हिरापूर येथील पटांगनावर होतील याची सर्व स्पर्धकांनी नोद घ्यावी. बक्षीस वितरण ८ मार्च ला संध्याकाळी ६:०० आहे.
*स्पर्धेचे नियम व अटी*
१. वरील सर्व स्पर्धा ह्या फक्त स्त्रियासाठी आहेत.
२. तालुक्यातिल सर्व स्त्रियांना या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
३. रांगोळी स्वतःच्या आवडीने काढावी व त्या साठी रंग स्वतःचे आणावे.
४. पर्यवेक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणी तो सर्व स्पर्धकांना मान्य असेल.
५. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीस आयोजक मंडळ हे जबाबदार राहणार नाही.
अधिक माहितीसाठी : संपर्क साधावा
१. कमलेश विलास गेडाम, कार्याध्यक्ष-मो.न. ८३९०७६१६५४
२. बादल अरुण गेडाम, संगणक चालक- मो.नं : ८३०८५१६७२५
या स्पर्धमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आयोजकतर्फे करण्यात आलेले आहे.



