अखिल भारतीय मादगी समाज संघटना तर्फे विविध मागण्यासाठी सुधिर मुनगंटीवारांना निवेदन
राज्याचे वने, सांस्कृतीक, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना मु पेंढरी तालुका सावली येथील मत्स्य महोत्सव व कार्यशाळेत आले असता अखिल भारतीय मादगी समाज संघटनेकडून सावली तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्र (एमआयडीसी) ची निर्मिती करण्यात यावी, अस्वच्छ कामगाराच्या मुलांना त्वरित शिष्यवृत्ती देण्यात यावी, सावली शहरात मादगी समाज भवन बांधून द्यावे, बाहेर राज्यात कामानिमित्त गेलेल्या व मृत पावलेल्या लोकांना आर्थिक मदत करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका विकासाच्या बाबतीत मागासलेला तालुका म्हणून ओळखल्या जातो. येथे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना रोजगार मिळत नाही म्हणूच मिळेल ते काम करण्यासाठी बाहेर राज्यात येथील युवक वर्ग जात असतो. यामध्ये अनेक तरुणांचा जीव गेलेला आहे या युवक वर्गाला तालुक्याची ठिकाणी काम मिळाल्यास आपले घर सांभाळत रोजी-रोटी मिळेल आणि नाहक त्यांचा जीव जाणार नाहीं. यासाठी तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्र (एमआयडीसी निर्मिती करून रोजगार उपलब्ध करुन द्यावा. तसेच बाहेर राज्यात काम करण्यासाठी गेलेल्या व आपला जीव गमावलेल्या व हात पाय गमावलेल्या युवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी.
अस्वच्छ कामगाराच्या मुलांना मागील अनेक वर्षापासून शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात याविषयी विचारणा केले असता केंद्र सरकार कडून अनुदान आले आहे परंतू राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे असे अधिकारी सांगतात याविषयी जिल्हाचे पालकमंत्री म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून गरिब विद्यार्थांना शिष्यवृत्ती मिळवून देणास हातभार लावावा. तालुक्याच्या ठिकाणी मादगी समाजाला समाज भवन बांधून द्यावे अशी विनंती समाज बांधवाकडून करण्यात येत आहे.
अशा अनेक कारणासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून अनेक मागण्या अखिल भारतीय मादगी संघटनेने केल्या. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल बोटकावार, संघटक रुपचंद लाटेलवार, सचिव बाळकृष्ण गोरडवार व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.



