कास्ट्राईब संघटन नसून सामाजिक चळवळ आहे जिल्हा अधिवेशनात अरुण गाडे यांचे प्रतिपादन
म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ही केवळ कर्मचाऱ्यांची संघटना नसून एक सामाजिक चळवळ आहे, म्हणून संघटनेच्या सभासदांनी आपल्या न्याय हक्कासाठी जसे जागृत असतात तसे सामाजिक भान ठेवून तळागाळातील वंचितांच्या न्याय हक्कासाठी ही सामाजिक जागृती करण्यासाठी लोकशिक्षकाची भूमिका अंगीकारावी असे प्रतिपादन म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आयोजित सिंदेवाही मधील तुलसी लॉन येथे आयोजित जिल्हा अधिवेशनात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ. अभिविलास नखाते तायवाडे महाविद्यालय कोराडी, प्रमुख मार्गदर्शक नरेन गेडाम राज्यकार्यकारिणी सदस्य सोशल एज्युकेशन मुव्हमेंट तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम शिवाजी महाविद्यालय राजुरा, किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी पं.स. सिंदेवाही, किशोर नागदेवते राज्य सहसचिव, यशवंत माटे विभागीय अध्यक्ष, कविता मडावी विभागीय अध्यक्ष (महिला), धम्मपाल गावंडे विभागीय उपाध्यक्ष, अरुण खराते जिल्हाध्यक्ष, जगदीप दुधे जिल्हा महासचिव हे उपस्थित होते.
सर्वप्रथम “दीपस्तंभ” या स्मरणिकेचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाचा सत्रात संघटनेच्या संघटनात्मक व शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. त्यात सुरेश राऊत मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा नाचनभट्टी पं. स. सिंदेवाही यांना सन 2022 चा महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, संजीवनी खोब्रागडे, विद्या कोसे, डॅनिअल देवगडे यांचा संघटनात्मक उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तर प्रशांत कऱ्हाडे शिक्षक जि. प. प्राथमिक शाळा रानतळोधी पं. स. भद्रावती, सोनाली ज्ञानवल शिक्षिका जि. प. प्राथमिक शाळा कुकुडहेटी, महेंद्र खोब्रागडे शिक्षक जि. प. प्राथमिक शाळा नाचणभट्टी, नलिनी शहारे शिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा जामसाळा पं. स. सिंदेवाही यांचा शैक्षणिक उत्कृष्ट कार्याबद्दल व धनपाल धारगावे शिक्षक, वंदना गोवर्धन शिक्षिका यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीप दुधे जिल्हा महासचिव, संचालन संगिता मानकर जिल्हा महिला प्रतिनिधी तर आभार प्रदर्शन शंकर मसराम जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन व नियोजन सिंदेवाही शाखेने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संदेश मानकर, प्रवीण थेरकर, कालूराम चहांदे, चंद्रशेखर मेश्राम, विनोद गेडाम, निखिल ठमके, राजकुमार पाटील, किशोर गेडाम, भोलानाथ कोवे सर्व तालुका अध्यक्ष, डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे, आदेश मानकर, दीपक मोटघरे, अतुल महाजन, सुनील निमगडे, डॅनिअल देवगडे, विद्या कोसे, संतोष सिडाम, सचिन रामटेके, संजीवनी खोब्रागडे, अनंत दुधे, सुवर्णा सुखदेवे, नंदू दडमल, रत्नमाला गेडाम, संगिता निमसरकार, संघपाल डांगे, विजय घडसे, गुलाब अलोने, अमोल चहांदे, मिथुन रामटेके, बबन दुर्गे, अशोक गावंडे, गोविंदा सोनटक्के, चंदा तुरे, हेमचंद रायपुरे, विजय घडसे, वैशाली कोवले, चंद्रकला ढोक, छाया मेश्राम, सोनाली ज्ञानवल तसेच सर्व जिल्हा व तालुका शाखा पदाधिकारी आणि सदस्य गण यांनी प्रयत्न केले.



