आगामी काळात देशाची महासत्तेकडे वाटचाल – चद्रशेखर बावनकुळे
*आगामी काळात देशाची महासत्तेकडे वाटचाल- चद्रशेखर बावनकुळे*
*पाथरी सर्कल अंतर्गत धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाचे आयोजन * *ब्रम्हपुरी विभागातुन २५ हजार पत्राची केली अपेक्षा **
बहुसंख्य भाजपा कार्यकर्तांची उपस्थित *
सावली (लोकमत दुधे/बाबा मेश्राम)
भारतीय स्वातंत्र्यानंतर देशात ६५ वर्ष सत्तेत असणारे सरकार देशाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही ते अल्पावधितच मोदिजीनच्या काळात असणारे सरकारने केले विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे आगामी काळात २०३५ मध्ये आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी आगेकूच करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम .चंद्रशेखर बाबनकुळे यांनी व्यक्त केले ते पाथरी सर्कल अंतर्गत.” धन्यवाद मोदीजी”कार्यक्रम उद्घाटक म्हणुन बोलत होते,

भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने पाथरी सर्कल अंतर्गत धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ,यावेळी मंचावर चंद्रपूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खास. अशोक नेते, माजी आम. अतुल देशकर, भाजपा चंद्रपूर अध्यक्ष देवराव भोंगळे , महिला जिल्हा अध्यक्ष अल्का आत्राम , जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, आशिष देवतळे, तालुका अध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतीश बोम्मावार, जिल्हा महिला उपाध्यक्ष निलम सुरमवार, तालुका महिला अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, संतोष तंगडपल्लीवार, अनिता ठिकरे सरपंच पाथरी,माजी जि.प सदस्य योगिता डबले,माजी सभा.योगिता डबले आदी मान्यवर उपस्थित होते..
कांगेस पक्षाने आपल्या कार्यकाळात विमान सेवा,औद्योगिक कारखाने, ईलेक्ट्निक्स वस्तू, मोबाईल ,आरोग्य सेवा,गरीबी निर्मूलन या कडे लक्ष दिले नाही, परंतु भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात प्रगती केलेले आहे,ऐवढेच नाही तर मोबाईल कंपन्या सह शस्त्रास्त्रे सुध्दा आपल्या देशात तयार करण्यात येतात,लसीकरण, औषधे, यात भारत देश आता परिपक्व होत आहे, त्याच बरोबर देशातील ७ कोटी लोकांना अन्न, देशात सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवेने परिपूर्ण एम्स हास्पीटल, देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २१ केंद्रीय विद्यालये, इंडियन इंस्टीट्युड आफ टेक्नॉलॉजी चा १६ कॉलेज, आदी मोदींच्या कार्यकाळात तयार.करण्यात आलेले आहेत मागील काळात केवळ सत्ताधिका ऱ्यानी दारू रेती चोरी गीटी चोरी आदि कमात मशगूल असल्याचा टोला ही त्यानी लावला
देशात कांग्रेस च्या काळात मोबाईल परदेशातुन येत होते ,परंतु. मोदींच्या काळात देशात २०० मोबाईल कंपन्या आहेत, २० वंदेमातरम एक्स्प्रेस सुरू झालेल्या आहेत ,संपूर्ण देशात वंदेमातरम एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहेत, त्याच बरोबर आपल्या देशातील माता भगिनी बाहेर शौचालय जात होत्या.त्याच्या साठी ७कोटी १४लाख शौचालय बांधण्यात आलेले आहेत कुणीही उघड्यावर बसू नये ,हा मुख्य उद्देश त्या मागील होत्या,
विदर्भाच्या विकासासाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ,यात सिंचन, तलाव, रस्ते, आरोग्य सेवा ,एमआयडीसी या निर्मिती करण्यात येणार आहे,२२कोटी लोकांना आरोग्य विमा देण्यात आलेला.आहे ,कोणत्याही एम्स हास्पीटल मध्ये जाऊन.५ लाख रुपयांचे औषधोपचार त्यांना करण्यात येणार आहे, उज्जवा गॉस सुध्दा देशातील २०कोटी लोकांना देण्यात आलेले आहेत ,
भारत देश काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विखुरलेला आहे , त्यामुळे काश्मीर साठी असलेली वेगळी कलम रद्द.करण्यात येऊंन सर्वाना तिथे जमीन खरेदी करण्याचा अधिकार.मा.नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतलेला आहे.असेही त्यांनी धन्यवाद मोदीजी कार्यक्रमात विविध कामाचा लेखाजोखा मांडताना स्पष्ट केले कार्यक्र मादरम्या या भागातुन २५ हजार पत्राची धन्यवाद मोदी जी असा पत्राची अपेक्षा ब्रम्हपुरी विभागातुन त्यानी यावेळी व्यक्त केलि
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल ,संचालन क्रिष्णा राऊत तर आभार दिलीप ठिकरे यांनी मानले ,यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यक्रर्ता उपस्थित होते ….



