चकपिरंजी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अरविंद भैसारे यांची निवड

सावली::(बाबा मेश्राम/लोकमत दुधे)
९सदस्यीय ग्रामपंचायत चकचिरंजी येथे सत्ता स्थापनेनंतर विद्यमान उपसरपंचानी राजीनामा दिल्यानंतर आज (२७फेब्रुवारी) रोजी सरपंच उषाताई गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच च्या निवडणूकीत कांग्रेस चे अरविंद भैसारे यांची एकमताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य वेणुदास मडावी, अमुत चौधरी, मेहमूदा शेख,प्रिती गावळे, रिना तावाडे आदी सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत चकपिरंजी च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सत्ता स्थापनेनंतर वेणुदास मडावी यांची उपसरपंच पदी निवडणूक झाली ,२वर्ष त्यांनी सदर पदाचा कार्यभार सांभाळला ,मात्र काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला,या रीक्त पदासाठी आज रोजी झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदी एकमताने अरविंद भैसारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त उपसरपंचाचे चकपिरंजी ग्रामवासियांनी स्वागत व अभिनंदन केले जात असुन नव्या कार्याच्या अपेक्षा वर्तविल्या आहेत,दरम्यान यावेळी नवनियुक्त उपसरपंच यांचे अभिनंदन ग्रामस्थ युवराज पेंदाम, किरण गावळे,कालीदास गावळे, मोहन आवळे ,दिप बावणे ,विलास मुस्कावार,जंगम संगावार ,अतुल चौधरी, भगवान लाडे,शिवाजी वाटगुरे यांनी केले आहे…