श्री शिवाजी महाविद्यालयात सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव संपन्न
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस विविध खेळ व तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. सुधाकराव कुंदोजवार, उद्घाटक नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले, शिक्षक पदवीधर मतदार संघ नागपूर, कार्याध्यक्ष, ॲड. संजयभाऊ धोटे, सचिव, अविनाश जाधव, सहसचिव, दौलतराव भोंगळे, कोषाध्यक्ष, साजिद बियाबनी, बाबासाहेब वासाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेरणी, डॉ. मल्लेश रेड्डी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. संजय लाटेलवार, उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना आमदार अडबाले यांनी दिद्यार्थ्यांना समयोचीत मार्गदर्शन करतांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय लाटेलवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सारिका साबळे यांनी केले तर आभार डॉ. संतोष देठे यांनी मानले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या *रांगोळी* स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. वैष्णवी देवानंद चांदूरकर, एम. ए. द्वितीय, द्वितीय क्रमांक कल्याणी संजय वासेकर, बी. कॉम. तृतीय, तृतीय क्रमांक प्रीती दिवाकर खाडे, ११ वी विज्ञान, तर प्रोत्साहनपर पारितोषिक मोनिका तिरुपती अप्पलवारला प्राप्त झाले. *न्यूज पेपर आर्ट* या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी देवानंद चांदूरकर, एम. ए. द्वितीय, द्वितीय क्रमांक शिवम बापूजी जूनघरे, १२ वी कला, तृतीय क्रमांक सुरज सुनिल पचारे, बी. ए. तृतीय, तर प्रोत्साहनपर पारितोषिक कु. साक्षी मोहन कांबळे, बी. एससी. द्वितीय हिला प्राप्त झाले. *अरेबिक मेहंदी* प्रथम क्रमांक रश्मी मारोती जानवे, बी. कॉम. तृतीय, द्वितीय क्रमांक पायल देवराव ठाकरे, एम. कॉम. प्रथम, तृतीय क्रमांक निलोफर रहमान शरीफ, एम. ए. प्रथम प्राप्त झाले. *दुल्हन मेहंदी* प्रथम क्रमांक प्राची शालिक खणके, बी. एससी. द्वितीय, द्वितीय क्रमांक राणी पत्रुजी करकाडे, बी. एससी. द्वितीय, तृतीय क्रमांक मयुरी श्रीधर उरकुडे हिने प्राप्त केलें. *केश रचना* स्पर्धेत प्रथम क्रमांक दामिनी एस. भोगा, ११ वी द्वितीय क्रमांक नंदिनी एन. देबनाथ, ११ वी, तर तृतीय क्रमांक श्रृती के. पाकावर ११ वी हिला प्राप्त झाले.
दुसऱ्या दिवशी *वक्तृत्व स्पर्धेत* प्रथम क्रमांक प्रतिक्षा वासनिक, बी. एससी. तृतीय, द्वितीय क्रमांक श्रृती मोहीतकर, १२ वी विज्ञान, तृतीय क्रमांक स्वरूप जीवने, तर प्रोत्साहनपर सुरज पाचर, बी. ए. तृतीय याने प्राप्त केला. *एकलनृत्य स्पर्धा* प्रथम क्रमांक कु. राधिका दोरखंडे, बी. एससी. द्वितीय, द्वितीय क्रमांक सुहानी नगराळे, ११ वी विज्ञान, तृतीय क्रमांक वैष्णवी देवानंद चांदूरकर, एम. ए. द्वितीय व प्रथम प्रोत्साहनपर. प्रिया जेनेकर, द्वितीय प्रोत्साहनपर संबोधिनी नगराळे, बी. एससी. तृतीय हिला मिळाले. *गीतगायन* स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी मानकर, बी. कॉम. तृतीय, द्वितीय क्रमांक आचल मंदे, बी. कॉम. तृतीय, तृतीय क्रमांक वैष्णवी देवानंद चांदूरकर, एम. ए. द्वितीय, तर प्रोत्साहनपर सुरज पाचरे, बी. ए. तृतीय, यांनी प्राप्त केला.
तिसऱ्या दिवसाची सुरवात *प्रश्नमंजुषा स्पर्धा* नी करण्यात आली. यात प्रथम क्रमांक शशिकांत महादेव गेडाम बी. ए. तृतीय व सुरज सुनिल पचारे, बी. ए. तृतीय या जोडीने, द्वितीय क्रमांक नितीन उमाटे, बी. ए. प्रथम व चेतन पाटील, बी. ए. प्रथम, या जोडीने तर तृतीय क्रमांक कु. प्रणाली कोरडे, बी. एससी. द्वितीय व कु. कोमल चन्ने . एससी. द्वितीय यांनी प्राप्त केला. *समूहनृत्य* स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका डोरखंडे अँड ग्रुप, व्दितीय क्रमांक वैष्णवी हिंगणे अँड ग्रुप, तृतीय क्रमांक वर्षा आत्राम अँड ग्रुप, तर प्रोत्साहनपर लवली धूर्वे अँड ग्रुप यांनी मिळविला.
महाविद्यालयाच्या परंपेप्रमाणे प्रतिवर्षी बेस्ट स्टूडेंट ऑफ दी ईयर ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेच्या विजेत्याला महाविद्यालयाकडून प्रती वर्षी रोख १७०००/- रुपयाचे पारितोषिक देण्यात येते. या वर्षीचा विजेता प्रज्वल बोबडे बी. ए. तृतीय, याला महविद्यायाकडून रोख १००००/- रुपये व सन्मानचिन्ह श्री अविनाश दोरखंडे यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचेकडून देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक कु. प्रतिक्षा वासनिक, बी. एससी. तृतीय, हिला ३०००/- रुपये रोख व सन्मानचिन्ह श्री अविनाश दोरखंडे यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचेकडून देण्यात आले. तर तृतीय क्रमांक विजेती संबोधीनी नगराळे बी. एससी. तृतीय हिला २०००/- रुपये रोख व सन्मानचिन्ह श्री अविनाश दोरखंडे यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचेकडून देण्यात आले. तर दुसरा तृतीय क्रमांकाचा विजेता सुरज पाचारे बी. ए. तृतीय यालाही रोख २०००/- रुपये व सन्मानचिन्ह श्री अविनाश दोरखंडे यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचेकडून देऊन सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वारकड व उपप्राचार्य डॉ. खेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. संजय लाटेलवार यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समिती सदस्य डॉ. संतोष देठे, डॉ. वनिता वंजारी, डॉ. वर्षा डांगे, डॉ. सारिका साबळे, प्रा. मनीष पोतनुरवार, प्रा. सुनिता जमदाले, प्रा. महेश गेडाम यांच्या मदतीने आणि सांस्कृतीक व क्रीडा महोत्सव आयोजित करण्यासाठी बनविण्यात असलेल्या सर्व समिती प्रमुख यांच्या व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला.



