चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचें आदेश
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे महाराष्ट्राचे पोलिस महसंचालक रजनीश सेठ यांना आदेश दिले. जिवती तालुक्यातील मौजा कुंसुबी येथील मे.मानीकगड सिमेंट कंपनी व मे.अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची, लिज ,व माईन्स तात्काळ बंद करन्याची मागणी तलाठी विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे केली आहे न्यायालयात हजर राहण्याची तारीख 03/02/2023 आहे होती परंतु जिल्हाधिकारी स्वतः हजर राहिले नाही. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पुराव्यासह दिनांक 30/6/2022 ला तक्रार दाखल करण्यात आली होती. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना संविधानिक अधिकार अनुच्छेद 338A असतानांही जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा यांनी न्यायालयाचे,आयोगाच्या,समन्सचे उल्लंघन केले आहे.अखेर आयोगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अटक करून हजर करा असे आदेश आज दिनांक 21/2/2023 ला पारीत केले. आयोगाला ,खोटी,बनावट,बोगस, आणि काल्पनिक माहिती राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना देने,व समन्स बजाऊनही उपस्थित न राहने महागात पडले. या आदेशामुळे प्रशासकीय विभागात खुप खळबळ माजली आहे.



