मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनेसाठी कार्यशाळा आयोजित
मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनेसाठी कार्यशाळा आयोजित
चंद्रपुर वन विभागाअंतर्गत वन विभाग आणि नवनिर्मिती सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गापुर ग्रामपंचायत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी घराजवळील, रस्त्यालगतचे परिसर साफ-सफाई ठेवणे आवश्यक आहे. कोंबड्या – बक-याचे मांसाचे तुकडे, घाण गावशेजारी उघड्यावर न फेकता खड्यात टाकुन बुजविणे गरजेचे आहे. जेणेकरून वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर असे मांसाहारी हिंस्त्र वन्यप्राणी सड्क्या मांसाच्या वासाने गावशेजारी, गांवात येणार नाहीत. तसेच गावशेजारील अनावश्यक झुडपे ग्रामस्थ स्वयं प्रेरणेने तोडून क्षेत्र साफ-सफाई ठेवणेही तेवढेच जबाबदारी आहे. वनक्षेत्रालगत एकटे-दुकटे न जाता समूहाने बोलत, आवाज करीत, मोबाईलवर गाणे वाजवित चालायला पाहीजे. जेणेकरून हिंस्त्र प्राणी आपल्याकडील आवाजाने दूर जातील आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळता येईल.
कार्यशाळेला पुणेकर उपसरपंच दुर्गापुर, बैस माजी मानद वन्यजीव रक्षक, दिपक वांढरे, अध्यक्ष निसर्ग सखा संस्था, अजय तिजारे क्षेत्र सहाय्यक दुर्गापुर यांनी मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार प्रदर्शन विलास कोसनकर यांनी केले.



