शालांत प्रमाणपत्र परिक्षा शांततेत
* तालुक्यात चार परिक्षा केंद्र *
“कॉपी बहादरासाठी भरारी पथक तैनात
*सावली*—
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या प्रमाणपत्र परिक्षा शांततेत सुरु असून परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त करण्यात आला आहे, नुकत्याच १२ वी च्या उन्हाळी परिक्षेला सुरुवात झाली असून तालुक्यात ४ परीक्षा केंद्र असून चार केंद्रा अंतर्गत ११८० विद्यार्थ्यांचा समावेश आहे
तालुक्यात ईयत्ता बारावीच्या उन्हाळी परिक्षेला नुकतीच सुरुवात झाली तालुक्यातील चार केंद्रावर.सदर.परिक्षा घेण्यात येत आहे, यात केंद्र क्रमांक ०२५० विश्वशांती विद्यालय सावली यात ५०९ परीक्षार्थी,०२५१ नवभारत विद्यालय व्याहाड बुज ३०६,केंद्र क्र.०२५२ विकास विद्यालय विहिरगाव,१७३ तर केंद्र क्र.०२५३ इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा १९२ आदी एकुण चार केंद्रावर ११८०परीक्षार्थींनी बसलेले होते.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ,ईयत्ता १२वी २१फेब्रुवारी ते २१मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहेत, जिल्ह्यात परिक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे, कॉपी बहाद्दरावर कडक कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, शिक्षण विभागाच्या भरारी पथका व्यतिरिक्त महसूल विभाग, व जिल्हा परिषद विभागांचे तालुका स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात आले आहेत,कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश ५० मिटर आतील सर्व झेराक्स दुकान बंद ठेवणे,केंद्रावर मोबाईल फोन,लॉपटाप वापरावर बंदी च्या सुचना देण्यात आल्या आहेत
कोरोनाच्या नंतर या चालु सत्रात नियमित शाळा,महाविद्यालये सुरू असून ऑफलाईन परिक्षा घेण्यात येत आहेत, परिक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त आहेत ,व सर्व नियमाचे पालन करण्यात येत आहे नुकताच इंग्रजी पेपर झाला असून परीक्षा केंद्रा वर विज्ञान , आर्ट , एम सी व्ही सी ,कार्मस , अशा वेगवेगळ्या फॉकल्टी विद्यार्थी परीक्षा देत आहेत …..



