ग्रामपंचायत तथा जि. प. उच्च प्राथ. शाळा कवठी येथे शिवजयंती थाटात साजरी
कवठी- ग्रामपंचायत कार्यालय तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावच्या सरपंच कांताबाई बोरकुटे तर प्रमुख अतिथी मनून उपसरपंच विलास बट्टे, पोलीस पाटील सचिन शिडाम, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तथा पत्रकार टिकाराम म्हशाखेत्री, ग्रामपंचायत सदस्य सुनील कुळमेथे, संगीता पाल, शिव स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत पुतणेलवार, सदस्य लोमेश घोटेकर, ग्रामविकास अधिकारी पारधी सर, अंगणवाडी सेविका राऊत मॅडम, रोजगार सेवक किशोर मुंगुले, शिपाई मारोती बोरकुटे, शाळेचे शिक्षक मांदाळे सर, सातेवार सर, वाकडे सर, आत्राम सर उपस्थित होते
शाळेचे मुख्याध्यापक नैताम सर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर सखोल प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व मार्गदर्शन दलांजे सर यांनी केले तर आभार कुळमेथे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.



