भारतीय स्टेट बँकेच्या एम आय डी सी शाखेत चोरट्यांचा डल्ला
भारतीय स्टेट बँकेच्या एम आय डी सी शाखेत चोरट्यांचा डल्ला
लॉकर मधून 14 लाख रुपये रोकड चोरट्यांनी पळवली
भारतीय स्टेट बँकेच्या चंद्रपूर – घुगुस मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील शाखेतून 14 लाख रुपये लॉकर मधून लंपास केलेले आहे. बँकेला सलग दोन दिवस सुट्टी असल्याने आणि ही शाखा लोक वस्तीत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डल्ला मारला. बँकेच्या लॉकर मधून पैसे चोरणे साधी गोष्ट नाही परंतु बँकेचे लॉकर फोडून पैसे चोरणे यामागे मोठी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. बँकेत चोरी झाल्याची माहिती बँकेतील कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी माहिती झाली लागलीच त्यांनी पडोली पोलिस स्टेशनला माहिती दिली. पडोलीचे पोलिस निरीक्षक सुनिलसिंग पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.



