बोरचांदली येथे गहू पीक पाहणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न
दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला कृभको (कृषक भारती को-ऑपरेटिव्ह कंपनी लिमिटेड ) तर्फे मौजा बोरचांदली येथील प्रगतशील शेतकरी हरिभाऊ येनगंटीवार यांचे शेतातील गहू पिक पाहणी कार्यक्रम संपन्न झाले. त्यावेळी रितेश मलगर इफको व पियुष नेमा यांचेकडून गहू पिक लागवड, संगोपन याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

त्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम मौजा बोरचांदली येथील प्रगतशील शेतकरी राजूभाऊ येनूगवार यांचे शेतावर घेण्यात आले.
रितेश मलगर, पियुष नेमा, हरिभाऊ येनगंटीवार उपसरपंच ग्रामपंचायत बोरचांदली, पेंढरी तालुका सावली येथील प्रसिद्ध मासे उत्पादक निनाद गड्डमवार, सावली येथील प्रसिद्ध कापूस उत्पादक शेतकरी डॉक्टर तुषार मर्लावार, विरई येथील फळबाग शेतकरी सुमित समर्थ, बोरचांदलीचे मासे उत्पादक शेतकरी राजूभाऊ येनुगवार सावली येथील परिचित अधिवक्ता तथा प्रगतशील शेतकरी एड. बी. टी लाडे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला मूल व सावली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी बहु संख्येने उपस्थित होते.
https://youtu.be/1sFpYR5ERuo
कार्यक्रमाचे संचालन महेशभाऊ कटकमकवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन येलट्टीवार यांनी केले.



