जि. प. प्राथमिक शाळा करगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
जि. प. प्राथमिक शाळा करगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगाव येथे दि. १९ फेब्रुवारी २०२३ ला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास लांडगे अध्यक्ष शा. व्य. स. हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सपनाताई माहुर्ले उपाध्यक्ष, हेमचंद तरारे सदस्य, उज्वलाताई रामटेके सदस्य शा. व्य. स. हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत मोठ्या उत्साहात म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव मेश्राम मुख्याध्यापक यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अक्षरा भरडकर वर्ग २ रा, उमंग रामटेके वर्ग २ रा, हेमांशू लोणारे वर्ग २ रा, सिमरन कावळे वर्ग ४ था, दिपाली मुळे वर्ग ५ वा, तिरुपती पाटेवार वर्ग ८ वा, रागिनी पाटेवार वर्ग १२ वा या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण दिले.
सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आदेश मानकर स. शि. यांनी केले.



