“शिवाजी महाराज की जय”च्या जयघोषाने बोथली नगरी दुमदुमली

स्थानिक बोथली येथील शिवराय सेना मंडळ द्वारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच गावामध्ये जयंती उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले होते.गावातील महिलांनी आप-आपल्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली.गावकऱ्यांच्या सहकार्याने जयंती दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी गावातून शिवाजी महाराज यांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.शोभायात्रेत गावातील असंख्य युवक मंडळी,पुरुष,महिला,बालगोपाल उपस्थित होते.
जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण बल्लिगवार, निलेश पुटकमवार, प्रतिक अल्लुरवार, सूरज कोतकोंडवार, स्वप्नील सायत्रवार, प्रनित गुज्जलवार, वैभव मुप्पावार, निर्भय मुप्पावार, अभिषेक बलिगवार, कल्पक पोवरे, कुणाल मुट्ठावार, क्रीष्णा मानिकवार, कार्तिक मराठे, नितेश रमिडवार, अंकुश झोलमवार, राधेश्याम कटकमवार, शुभाष अप्पकवार तसेच शिवराय सेना मंडळाचे सर्व सदस्य, युवक मंडळ, गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
,