सावली तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबध्द पत्रकार परिषदेत आमदार विजय वडेट्टीवारांची घोषणा

- सर्वांना मोफत नवीन नळ जोडणी मिळणार ,
दोन वर्षांचे पाणी कर माफ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविनार
नळ योजनेसाठी 12 कोटी रुपये दिले आता सर्वांना मोफत नळ जोडणी मिळणार आहे. नगर प्रशासनाने जे जाचक अटी घातल्या होत्या की, नळाला पाणी न आल्यास तक्रार करायची नाही ही अट तूर्तास शिथिल करण्यात आलेली आहे. सावलीकरांना २४ तास पाणी पुरवठा व्हावा यासाठी एक्स्प्रेस फिडरची निर्मिती करण्यात आली आहे. सावली तालुका काँगेस कमिटीत पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असल्यामुळे दोन वर्ष शहरातील नळाला पाणी पुरवठा होत नव्हता या दोन वर्षाचा पाणी कर पूर्णपणे माफ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. आणि जुना पाणी कर टप्प्याटप्प्याने नागरिकांकडून वसूल करण्यात याव्या कोणालाही नवीन नळ जोडणी नाकारू नये अश्या स्पष्ट सूचना देण्यात आहे. रमाई भवन, नवीन बसस्थानकाच्या मागे बगीचाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. तसेच पंचायत समितीच्या बाजूला नवीन वाचनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या सामान्य फंडातून नाली दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय घनकचरा व्यवस्थापन इत्यादी सुर्व सोयी करता येईल. स्वच्छता अभियानात भाग घ्यायचे असेल किंवा आदर्श नगरपंचायतमध्ये भाग घ्यायचं असेल तर 100 टक्के वसुली होणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर वासियांनी नागरिकांनी टॅक्स लवकरात लवकर भरावे असे आव्हाहन करण्यात आले. तहसिल कर्मचाऱ्यासाठी, वनकर्मचारीसाठी, बांधकाम विभागातील वसाहत बांधण्याचा करण्याचा काम सूरू आहे. सामाजिक सभागृह ३५ लाखाचे बांधले यामध्ये गरीब मुलामुलींचे विवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत.न्यायालयाची इमारत बांधण्यात आली. असे विविध समाजपयोगी काम सुरू आहेत. सावली शहराचा पर्यायाने सावली तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबध्द आहे असे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत सांगत होते. प्रत्येक गल्लीमध्ये नळ पाईप लाईन पुरविण्यात यावा, हर घर जल देण्यात यावे. सावलीमध्ये एक्स्प्रेस फिडर अजूनपर्यंत सुरु झालेला नाही, फेरफार होत नाही. सावली शहरातील मोकाट जनावरांचा तसेच कुत्रांचा हैदोस वाढला आहे असे अनेक प्रश्न पत्रकारानी विजय वडेट्टीवार यांना विचारले असता नगरपंचायतने मोकाट जनावरांचा व कुत्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या. सर्व समस्या सोडविण्यासाठी माझ्या परीने पुर्ण प्रयत्न करणार व सावली शहराला विकासाच्या दिशेने नेणार