*शरदचंद्र पवार उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
अंकुर बहुउद्येशिय शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित शरदचंद्र पवार उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे वर्ग ११ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. *विद्यार्थ्यांनी बारावी नंतर काय करावे, कोणत्या क्षेत्राची निवड करावी आणि कशी करावी याविषयी मार्गदर्शन नायब तहसिलदार सागर कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी बारावी नंतर उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे उचित मार्गदर्शन केले. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत गाडेवार होते त्यांचे सुध्दा मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले. तसेच वर्ग ११वीआणि १२ च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाऊक होऊन मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात रेशमी भोयर या विद्यार्थिनीच्या प्रास्ताविकेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या संचालन निराशा मुंघाटे तर आभार प्रणय वाघाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एच. डी. गुरनूले, प्रा. वि. जी धकाते प्रा.राखी गोहने, प्रा.दिपक चूनारकर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



