*नव्या सुधारित पाईपलाईन साठी नागरिकांची पायपीट*
+महिलांचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन+
“जाचक अटीमुळे नागरिक संभ्रमात”
*सावली*-(बाबा मेश्राम/लोकमत दुधे)- सावली शहरात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १९८५ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साधी नळ योजना ,सुरू करण्यात आली,त्यानंतर.ग्रामीण पाणीपुरवठा योजना सिंदेवाही च्या माध्यमातून फिल्टर नळ योजना सुरू होती ,त्यांनंतर नगरपंचायती रुपांतर झाल्यावर तसेच शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची समस्या लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री यांनी १२ .५०कोटीची जल शुध्दीकरण केंद्रातंर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली ,या योजनेद्वारे नगरातील प्रत्येक प्रभागात नवीन पाईपलाईन टाकल्या गेली,परंतु शहरातील प्रभाग क्रमांक ५ येथील काही भागात अजुनही नवीन पाईपलाईन टाकल्या गेली नसल्याने या प्रभागातील महिलांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन नवीन पाईपलाइनटाकून देण्याची मागणी केली आहे,

सावली शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता ,वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली ,तिचे काम पुर्णत्वास गेले असुन या योजने द्वारे नवीन नळ कनेक्शन देण्यात येत आहेत, असे असताना प्रभाग क्रमांक ५ येथील काही भागात अजूनही नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही, या प्रभागातील काही नागरीकांनी नगरपंचायत मध्ये जाऊन नवीन नळ कनेक्शन साठी असलेल्या अटी व शर्तीची पुर्ताता केली,टाक्सचा भरणा केला,परंतु त्यांच्या भागातून पाईपलाईन न गेल्याने संतप्त महिलांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन.दिले व पाईपलाईन टाकून देण्याची मागणी केली,
सावली शहरात साधे व फिल्टर नळ योजनेचे मिळुन ९२६ कनेक्शन अस्तित्वात आहेत तर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ज्याच्या कडे पुर्वीपासुनच नळ नाही अशांना पंधराशे रुपये,डिपाझीट,तर ज्याच्या कडे नळ आहेत ,अशांनी नवीन नळ कनेक्शन साठी मालमत्ता व पाणी पट्टी कराचा भरणा करून कनेक्शन घ्यावे ,या सोबतच हमीपत्र सुध्दा नागरिकांकडून मागविण्यात येत आहेत, ज्यात काही अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत ,यात क्रमांक ७ ची अट हि जाचक व कोड्यात टाकणारी दिसत आहे ,ज्यात नगरपंचायत कडुन मिळालेल्या खाजगी नळ कनेक्शन चा कसलाही प्रकारे दुरुपयोग करणार नाही व पाणी पुरवठा कमी मिळाल्यास त्या बाबतीत तक्रार करणार नाही ,अशा अटीमुळे नागरिक संभ्रमात आहेत की पाणी पुरवठा योग्य होत नसेल तर तक्रार कुणाकडे करायची ,फक्त कराचा भरणा करून गप्प राहायचे का? सोबतच शहरातुन राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले, त्यावेळी अनेक वेळा पाईपलाईन फुटुत होती,तसेच तांत्रिक कामासाठी नळ बंद ठेवण्यात येत होते, त्यावेळेस दोन. वर्ष पाणीपुरवठा बरोबर होत नव्हता ,ऐवढेच नाही तर काही प्रभागात पाणीच येत नव्हते अशा बिकट पाणी समस्येला सावलीकर समोर गेले असताना अशा जातक अटी न लावता त्या काळातील पाणी पट्टी कर माफ करावा अशी मागणी सावली वासिय जनता करीत आहेत दरम्यान यावेळी ,नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देताना प्रभाग क्र ५मधील वृंदा दुर्गे,ताराबाई देवतळे, मालन बाई सेमस्कार, योगिता गेडाम, सौ मोतीप्रभा
मानकर ,आदी सह प्रभागातील महिला उपस्थित होत्या



