त्यागमुर्ती रमाई जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा
*त्यागमुर्ती रमाई जयंती उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा*
“अस्थाई समिती सावलीचे आयोजन”
*सावली*(बाबा मेश्राम)—त्यागमुर्ती माता रमाई यांची १२५वी जयंती ,डा बाबासाहेब आंबेडकर अस्थाई समिती सावली च्या वतीने समाज मंदीरच्या प्रांगणात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला, यावेळी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस मालार्पण करुन वंदना घेण्यात आली,

त्यागमुर्ती रमाईच्या.कार्यांना उजाळा देण्यात आला,”प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ,त्याचप्रमाणे घटनेच्या शिल्पकारांमागे माता रमाई चा हात होता , अतिशय हाल अपेष्टा सहन करुन जीवन जगल्या,आपले पती हे शोषित ,पिडित ,गोरगरिब लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करीत आहेत, असे त्या.म्हणत असत,कोणतीही अपेक्षा न करता ,डा बाबासाहेबांना त्या मदत करीत,गोव-या,शेण थापुन आपल्या संसाराचा गाडा त्या चालवित होत्या ,व आपल्या समाजाच्या उधारासाठी,शोषित, पिडीत लोकांच्या उधारासाठी कार्य करणाऱ्या आपल्या पती डा बाबासाहेबांना मदत करीत होत्या , त्यांचे कार्य हे प्रेरणादायी होते, यावेळी असे मार्गदर्शन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले,
डा बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती सावली च्या वतीने यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,यात रांगोळी, संगीत खुर्ची, वक्तृत्व, एकल नृत्य, समुह नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या ,विविध स्पर्धेतील प्रथम,द्वितीय, तृतीय विजेत्याना रोख रक्कम बक्षीस म्हणुन देण्यात आली,तसेच ईयत्ता दहावी,बारावी मधील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार, करण्यात आला, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन विविध विभागात शासकीय नौकरीवर.लागलेल्या ,समाजातील होतकरु विद्यार्थांचा सुध्दा सत्कार.यावेळी करण्यात आला,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिति च्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले..



