सिंदेवाही मुल महामार्गावर दुर्दैवी भीषण अपघात

सिंदेवाही मुल महामार्गावर दुर्दैवी भीषण अपघात
सिंदेवाही तालुक्यातील सरडपार गावालगत पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक व युवती जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा युवक गंभीर जखमी झालाआहे. सदर अपघात काल रात्री ८.०० वाजताच्या सुमारास घडला.अपघातानंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेत मृतक सुमित राजू अलोणे वय २३ वर्षे ,मृतक सेजल अनिल कुंभारे वय १९ वर्षे तर गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव अक्षय यादव लेनगुरे (२३) असे आहे. सदर जखमी युवकाला चंद्रपूर येथे तत्काळ हलविण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास सिंदेवाही पुलिस स्टेशन चे नव नियुक्त ठानेदार तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय महल्ले, पीएसआय नेरलावार पो.हवा. देवा सोनुले ,पो.शी रणधीर मदारे, पो.शी गणेश मेश्राम पो.शी मंगेश मातेरे, पो.शी सावसाकडे पो.शी मंगेश श्रीरामे करीत आहे.
