*विधी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी…*
*विधी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी…*
विधी तिसर्या व पाचव्या वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दि 14/02/2023 पासून होणाऱ्या विधी प्रथम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी निवेदन दिले असून, या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी सांगितले की, 3 वर्षांच्या प्रवेशासाठीची शेवटची संस्थात्मक फेरी 10 डिसेंबर 2022 रोजी संपली व 5 वर्षांच्या प्रवेशासाठीची शेवटची संस्थात्मक फेरी 8 डिसेंबर 2022 रोजी संपली.
विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा ९० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर व्हायला पाहिजे होती. तथापि, 8 व 10 डिसेंबर 2022 पासून ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यानचा कालावधी 3 महिन्यांचा पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे.? यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक पुढे ढकलण्यात यावी करीता *गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख यांना* निवेदन देण्यात आले व यावर विचार करण्याची विनंती केली आहे. यावेळी विधी अभ्यासक्रम 3 वर्ष व 5 वर्ष शिक्षण प्रथम वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते…



