Vidarbh24News

Latest Online Breaking News

*रूद्रापुर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी*

*रूद्रापुर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी*
प्रतिनिधी:
प्रत्येक मानवाने आपले जीवन सुसंस्कारमय व आदर्शमय घडविण्यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रूद्रापुर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वा पुण्यतिथी महोत्सव सर्व संत स्मुर्ती महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये ध्यानपाठ,ग्रामसफाई,महिला मेळावा,रांगोळी स्पर्धा,ग्रामगीता वाचन स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,गितगायन स्पर्धा घेण्यात आली.संत श्री मुरलीधर महाराज,हरणघाट यांचे शुभहस्ते घटस्थापना करण्यात आली.तसेच भजन,कीर्तन आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्यात आली.
सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजीवन प्रचारक डॉ.कुंभारे गडचिरोली, , प्रा.मिलिंद सूपले,प्रा.शेखर प्यारमवार,यांचे मार्गदर्शन लाभले.
समारोपीय दिवशी संपूर्ण रूद्रापुर नगरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी(रामधून) काढण्यात आली.यामध्ये पारडी,रुद्रापुर, उसेगाव,चांदापुर,पालेबारसा, भद्रावती,तुकुम,खेडी, चिमढा, हिरापुर,भवराळा,चिखली,डोंगरगाव,निमगाव,निफंद्रा,येथील गुरुदेव भक्त तसेच गावातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.ह.भ.प.विजयानंद रोडे महाराज यांच्या किर्तनाने गोपालकाला करण्यात आला.
महोत्सवाच्या शेवटी सर्व –
धर्म प्रार्थना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील पुरुष, महिला,युवक मंडळी, बाल- गोपाल,गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त गावातील जनतेचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!